प्रतिक काळे आत्महत्येस गडाखच जबाबदार....गडाखांना मंत्रीपदावरुन बाजूला करावे, भाजप आक्रमकप्रतिक काळे आत्महत्येस गडाखच जबाबदार....गडाखांना मंत्रीपदावरुन बाजूला करावे, भाजप आक्रमक


मुंबई : मुळा संस्थेत कार्यरत असलेल्या आणि प्रशांत गडाख यांचा स्वीय सहायक म्हणून कार्यरत असलेल्या प्रतीक काळे या युवकाच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री शंककरराव गडाख यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी या प्रकरणात गडाखांवर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर आता प्रदेश भाजपाने या मुद्दयावर आवाज उठवला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेवून गडाखांवर निशाणा साधला आहे. आत्महत्येपूर्वी प्रतिक काळे याने व्हिडीओ बनवला होता. त्यात त्याने संस्थेतील कर्मचार्‍यांसह मंत्री गडाख यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यावरुन भाजपने गडाखांवर टिका केली आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे, प्रतिक काळेला न्याय द्यायचा असेल तर गडाख यांनी राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाजुला करावे अशी मागणी भाजपने केली आहे. या पत्रकार परिषदेला नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post