विराटचे ‘ते’ निर्णय चुकले आणि भारताला पत्कारावा लागला पराभव

विराटचे ‘ते’ निर्णय चुकले आणि भारताला पत्कारावा लागला पराभव

 


मुंबई : टी20 वर्ल्ड कपमध्ये  न्यूझीलंड विरुद्ध  टीम इंडियाचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची आशा अंधूक झाली आहे. कॅप्टन विराट कोहलीचा  हट्ट या पराभवाचं मोठं कारण ठरला आहे. विराटनं या मॅचमध्ये तीन मोठे निर्णय घेतले, पण त्याचा एकही निर्णय यशस्वी झाला नाही.


न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियानं सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशनला  प्लेईंग 11 मध्ये संधी दिली. इशान ओपनिंगला खेळणार असं विराटनं टॉस दरम्यानच सांगितलं होतं. फक्त 3 आंतरराष्ट्रीय मॅचचा अनुभव असलेल्या इशानला नव्या बॉलवर ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी   या स्विंग बॉलर्सचा सामना करावा लागला. इशानला या मॅचमध्ये कमाल करता आली नाही. तो बोल्टच्या बॉलिंगवर फोर मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाला.

विराट कोहलीनं इशानला टॉप ऑर्डरमध्ये खेळवण्यासाठी रोहितला तीन नंबरवर खेळण्याचा आश्चर्यजनक निर्णय घेतला. रोहित 14 बॉलमध्ये 14 रन काढून आऊट झाला. त्यामुळे मिडल ऑर्डरवरील दबाव आणखी वाढला. रोहितचा ओपनर म्हणून दमदार रेकॉर्ड आहे. त्यानं 113 आंतरराष्ट्रीय टी20 मॅचपैकी 80 मॅचमध्ये ओपनिंग केली आहे. त्यामध्ये त्यानं 2404 रन केले असून टी20 क्रिकेटमध्ये 4 शतकही झळकावली आहेत. केएल राहुलनं 4 नंबरवर बॅटींग करताना 5 मॅचमध्ये 87 च्या सरासरीनं 174 रन केले आहेत. यामध्ये एका शतकाचीही समावेश आहे. कोहलीला बॅटींग ऑर्डरमध्ये बदल करायचा होता तर तो राहुलला नंबर 4 वर खेळवून रोहित आणि इशान यांनी इनिंगची सुरुवात केली असती. पण, विराटनं तसं केलं नाही. विराटही 3 ऐवजी 4 नंबरवर बॅटींगला आला. तो 9 रन काढून आऊट झाला. विराट आऊट झाल्यानंतर टीम इंडियाला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं आणि न्यूझीलंडनं सहज विजय मिळवला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post