नगर तालुक्यात अपघातात बिबट्याचा मृत्यू

नगर तालुक्यात अपघातात बिबट्याचा मृत्यू



नगर -औरंगाबाद महामार्गावरील जेऊर शिवारात जरे वस्ती जवळ शुक्रवारी (दि.२६) पहाटेच्या सुमारास नरभक्षक बिबट्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. सकाळी ही घटना उघडकीस आली. 


नगर तालुक्यातील जेऊर येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्या दर्शन देत होता. तीन शेळ्या, व एका कुत्र्याचा त्याने फडशाही पाडला होता. त्यामुळे जेऊरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  ग्रामस्थांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. परिसरात बिबट्याच असल्याचे स्पष्ट झाले होते.त्यामुळे वन विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले होते.

आज पहाटे तो नरभक्षक बिबट्याचा अपघातात मृत्यू झाला. अखेर भीतीच्या सावटाखाली असलेल्या जेऊरकरांनी सुटकेचा निश्वास टाकला. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post