मनपा कर्मचारी पतसंस्थेसाठी सहकार पॅनलच्या उमेदवारांचे अर्ज दाखल...मोठं शक्तीप्रदर्शन

 नगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू 


शेवटच्या दिवशी सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत केले उमेदवारी अर्ज दाखल

पारदर्शक कारभार हाच आमचा पॅनलचा अजंठा- उमेदवार बाबासाहेब मुदगल यांची माहिती 


 नगर - अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक जाहीर झाली असून २०२१ते २०२६ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत बाबासाहेब मुदगल आणि जितेंद्र सर यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत  फेरी काढता  आपले उमेदवारी अर्ज दाखल केले

.यावेळी सहकार पॅनल मध्ये सर्वसाधरण गटातून बाबासाहेब मुदगल,जितेंद्र सारसर, बाळासाहेब पवार, अजय कांबळे,कैलास चावरे, सतीश ताठे, श्रीधर देशपांडे, विकास गीते, विजय कोतकर, बलराज गायकवाड, महिला राखीव गटा मधून प्रमिलाताई पवार ,उषाताई वैराळ, इतर मागास प्रवर्ग गटा मधून किशोर कानडे अनुसूचित जाती जमाती गटा मधून गुलाब गाडे तर इतर भटक्या विमुक्त जाती गटा मध्ये बाळासाहेब गंगेकर हे उमेदवारी करत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post