महानगरपालिकेच्या ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा 'ओंकारनगर पॅटर्न'

 महानगरपालिकेच्या ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा 'ओंकारनगर पॅटर्न'


 ऑनलाईन शिक्षणाबरोबरच गृहभेटी द्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू.कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे गेल्या पावणेदोन वर्षांपासून राज्यातील इ.१ ली ते ४ थीचे वर्ग सुरू होऊ शकले नाहीत.त्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबला जात आहे.पण ज्या पालकांकडे स्मार्टफोन व ऑनलाईन शिक्षणासाठी लागणाय्रा सुविधा उपलब्ध नाहीत.अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील ओंकारनगर प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना गुगल मीट व झूम मीटद्वारे ऑनलाईन शिक्षण देत आहेत.पण काही पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी ओंकारनगर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वॄषाली गावडे विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गटागटाने विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत आहेत.

जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणात आवश्यक सुविधेअभावी सहभागी होऊ शकत नाहीत.अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी छापील अभ्यास तयार केला आहे.हा छापील अभ्यास विद्यार्थ्यांना घरी जाऊन सर्व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून शिक्षक सोडवण्यास मदत करतात.शिक्षकांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप मदत होत आहे.विद्यार्थ्यांना आठवड्याचा अभ्यास दिला जातो व पुढील आठवड्यात तो तपासून पुन्हा नवीन अभ्यास दिला जातो.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांचा नियमितपणे अभ्यास सुरू आहे.

ऑनलाईन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक योगदिन,बालदिंडी, राष्ट्रीय क्रीडा दिवस,किल्ले बनवा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, राष्ट्रीय पोषण माह सप्ताह हे उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबवले जात आहेत.त्याचप्रमाणे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांसाठी राष्ट्र सेवादलाच्या सेविकांमार्फत ऑनलाईन कथामाला सुरू आहे.यामध्ये रामायण कथा, शिवरायांच्या कथा, क्रांतिकारकांच्या कथा विद्यार्थ्यांना दररोज मोबाइलवर पाठवल्या जातात.

 त्याचबरोबर ओंकारनगर शाळेचे स्वतःचे अँड्रॉइड ॲप आहे. या अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे घटक अभ्यासता येतात त्याच बरोबर सामान्य ज्ञान,स्पोकन इंग्लिश, दैनंदिन घडामोडी इत्यादींचा अभ्यास करता येतो.तसेच एससीईआरटीमार्फत सुरू असलेल्या 'शिकू आनंदे', 'साप्ताहिक ऑनलाईन स्वाध्याय' 'दीक्षा ॲप' या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे.त्याप्रमाणे खेळातून शिकण्यासाठी  मुंबई येथील टॉय बँक संस्थेच्या माध्यमातून दरमहा विद्यार्थ्यांचे ऑनलाइन टॉय बँक सेशन घेतले जाते.यामुळे विद्यार्थी आनंदाने खेळाद्वारे अभ्यास करतात.

ओंकारनगर शाळेतील शिक्षक राबवित असलेल्या या विविध उपक्रमांचे नगरसेविका सुनिता कोतकर, नगरसेवक अमोल येवले, नगरसेविका शांताबाई शिंदे, नगरसेवक विजय पठारे,मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण,केंद्रसमन्वयक चंद्रशेखर साठे,विषयतज्ञ अरुण पालवे यांनी कौतुक केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post