जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग सात जण गंभीर तर वीस जणांवर उपचार सुरू

 जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग

सात जण गंभीर तर वीस जणांवर उपचार सुरू

आ.संग्राम जगताप यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची केली मागणी


अहमदनगर प्रतिनिधी - सकाळी साडेदहाच्या सुमारास अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभाग आला भीषण आग लागली या ठिकाणी साधारण 20 ते 25 जण उपचार घेत होते भीषण आग लागल्याने परिस्थिती तनाव जनक निर्माण झाली काही वेळातच अग्निशामक दलाच्या गाड्या त्याठिकाणी दाखल झाल्या इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन या अतिदक्षता विभागात धाव घेतली व रुग्णांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले संपूर्ण आय.सी.यु जळून खाक झाले.अद्याप किती जण मृत्यू पावले याबाबत जिल्हा रुग्णालय कडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही सदर घटनास्थळी आमदार संग्राम जगताप दाखल होऊन रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या तर काही गंभीर रुग्णांना खाजगी रुग्णालयात हलवण्याची गरज असल्यास तातडीने संबंधित रुग्णांना हलवा अशा सूचना त्यांनी दिल्या व या घटनेची सखोल माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा जिल्हाधिकारी यांना सदर घटनेची माहिती दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post