पतसंस्थेत भरदिवसा गोळीबार करून लाखोंची लूट...व्यवस्थापकाचा दुर्देवी मृत्यु

पतसंस्थेत भरदिवसा गोळीबार करून लाखोंची लूट...व्यवस्थापकाचा दुर्देवी मृत्यु  जुन्नर तालुकयातील 14 नंबर कांदळी येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) यांचा मृत्यू झाला आहे.

 अनंत पतसंस्था ही पुणे नाशिक महामार्ग लगत आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर व लिपिक अंकिता नेहरकर हे जेवण करत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश केला. व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशाची मागणी करत गोळीबार केला. यामध्ये भोर यांना उपचारासाठी नारायणगाव याठिकाणी नेत असताना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत घटनास्थळी पोलीस आणि श्वान पथक दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post