शेवगाव बाजार समिती संचालकांचे अपघाती निधन

 शेवगाव बाजार समिती संचालकांचे अपघाती निधनशेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय विश्वनाथ शिंदे (वय 52, रा. जुने दहिफळ, ता. शेवगाव) हे अहमदनगरहून शेवगावकडे आपल्या बोलेरो जीपमधून जात होते. शेवगावकडे जात असतांना तिसगाव ते वृद्धेश्वर कारखाना दरम्यानच्या रस्त्यावर वाहनावरील नियंत्रण सुटून बोलेरो जीप पलटी झाली.

हा अपघात आज रविवारी पहाटेच्या सुमारास घटला. बोलेरो पलटी झाल्याची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी व पहाटे फिरण्यासाठी येणार्‍या लोकांनी मदतकार्य केले.उपचारासाठी त्यांना तिसगाव येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान संजय शिंदे यांचे अपघाती निधन झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post