जिल्हा परिषदेसाठी चारही प्रमुख पक्षांची तयारी... 'मिनी विधानसभे'साठी दिग्गजांची लागणार 'कसोटी'

 

जिल्हा परिषदेसाठी चारही प्रमुख पक्षांची तयारी... 'मिनी विधानसभे'साठी दिग्गजांची लागणार 'कसोटी'नगर: नगर जिल्हा परिषदेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. यात अध्यक्षपद राष्ट्रवादी, उपाध्यक्षपद काँग्रेस, अर्थ व पशू संवर्धन समिती शिवसेना, बांधकाम व पशुसंवर्धन समिती शिवसेना, समाजकल्याण समिती राष्ट्रवादी, महिला बालकल्याण समिती काँग्रेसकडे आहे.

राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषद निवडणुका एकत्र की स्वतंत्र लढणार याबाबत अद्याप महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जाहिर केलेले नाही. यामुळे याबाबत ऐनवेळी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याच्या तयारीत आहे. पक्षाकडे आज जिल्ह्यात दोनच आमदार असले तरी प्रत्येक तालुक्यात वजनदार नेते भाजपकडे आहेत. त्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी आघाडीतील तीनही पक्ष एकत्र येतात की स्वतंत्र लढतात यावर निकालाची गणितं व पुढील सत्तासमीकरण अवलंबून असतील. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post