जिल्हा रुग्णालयात अग्निकांड, मयताच्या नातेवाईकांना मदत जाहीर, आठ दिवसांत चौकशी अहवाल....

 

जिल्हा रुग्णालयात अग्निकांड, मयताच्या नातेवाईकांना मदत जाहीर, आठ दिवसांत चौकशी अहवाल....नगर: अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती  तातडीने  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिली, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत असून या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती टोपे यांनी दिली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post