नगर जिल्ह्यात आदित्य ठाकरे यांचा जमिनीवर बसून विद्यार्थ्यांशी संवाद... मंत्री थोरात पाहतच राहिले...

 

नगर जिल्ह्यात आलेले आदित्य ठाकरे यांचा जमिनीवर बसून विद्यार्थ्यांशी संवाद...नगर :  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींशी थेट जमिनीवर बसून संवाद साधला आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांचा फोटो काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शेअर केलाय. या फोटोची सगळीकडे चर्चा होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे दंडकारण्य अभियान सांगता सोहळ्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी अदित्य‌ यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ठाकरे यांनी संगमनेरच्या कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळेस भेट दिली. ही शाळा आदर्श आदिवासी आश्रमशाळा म्हणून नावाजलेली आहे. यावेळी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळेपणाने तसेच आपुलकीने संवाद साधला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post