विनोद तावडे आता राष्ट्रीय राजकारणात... पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी

 

विनोद तावडे आता राष्ट्रीय राजकारणात... पक्षाने सोपवली मोठी जबाबदारीमुंबई: भाजपच्या नव्या राष्ट्रीय समितीची घोषणा झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून माजी  मंत्री विनोद तावडेंची वर्णी लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी परिपत्रक काढून यासंदर्भात घोषणा केली आहे.

नुकतेच भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यंदा चित्रा वाघ आणि विनोद तावडे यांना संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र, त्यांचा पत्ता कट झाला. आता विनोद तावडे यांना थेट राष्ट्रीय समितीवर घेण्यात आलं आहे. तावडे फडणवीस सरकारमध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. आता तावडेंना राष्ट्रीय राजकारणात स्थान देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post