T-20 विश्वचषक...भारताचा सलग दुसरा पराभव... उपांत्य फेरीच्या आशा धूसर

 

T-20 विश्वचषक...भारताचा सलग दुसरा पराभव... उपांत्य फेरीच्या आशा धूसरयंदाचा टी20 विश्वचषक  भारतासाठी अतिशय निराशाजनक सुरु आहे. सलग दुसऱ्या सामन्यातही भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर आता न्यूझीलंडने 8 विकेट्सनी नमवत भारताचं पुढील फेरीचं स्वप्नही जवळपास धुळीस मिळवलं आहे.

सलग दोन पराभवांमुळे भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहचला आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असणाऱ्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघापासून भारत फार दूर असल्याने पुढील फेरीत पोहचणं अवघड झालं आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने केवळ 110 धावा केल्या. ज्या पूर्ण करताना न्यूझीलंडला अधिक मेहनत घ्यावी लागली नाही. त्यांनी केवळ 2 विकेट्स गमावत  14.3 ओव्हरमध्ये या धावा पूर्ण करत 8 विकेट्सनी विजय मिळवला. सामन्यात भारतीय फलंदाजांचा खराब फॉर्म पुन्हा एकदा दिसून आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post