ऐन दिवाळीत साखर महागली...निर्यातीमुळे दरवाढ

ऐन दिवाळीत साखर महागली...निर्यातीमुळे दरवाढ दिल्ली – देशात साखरेचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होऊन देखील साखारेच्या दरात प्रति कोलो  5 रुपयांची वाढ झाली आहे. साखरेची निर्यात वाढवल्याने भाव वधारले असल्याचे दिसून येत आहे.  ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 26 जुलै 2021 ते 26 ऑक्टोबर 2021 या तीन महिन्यांच्या कालावधीत साखरेचे दर तब्बल पाच रुपयांनी वाढले आहेत. 26 जुलै 2021 ला साखरेचे दर 38 रुपये प्रति किलो होते.  त्यामध्ये वाढ होऊन 26 ऑक्टोबरला साखर 43 रुपयांवर पोहोचले आहेत.

भारतामध्ये दरवर्षी साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र गेल्या वर्षी जगासह देशावर कोरोनाचे संकट असल्याने निर्यातीला ब्रेक लागला होता. निर्यात घटल्याने मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाला, त्यामुळे दर नियंत्रणात होते. मात्र आता हळूहळू जग कोरोनाच्या संकटातून सावरत असून, निर्यातीला वेग आला आहे. भारताने साखरेची निर्यात वाढवल्याने गेल्या तीन महिन्यामध्ये साखरेचे दर वाढले असल्याचे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चालू वर्षामध्ये साखर कारखान्यांनी तब्बल 72 लाख टन साखरेची निर्यात केली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post