राज्यात मुख्यमंत्री बदलले काय? शरद पवार कसे काय घोषणा करतात..

 राज्यात मुख्यमंत्री बदलले काय?  शरद पवार कसे काय घोषणा करतात.. मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागणीसाठी संप पुकारला असून न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.  एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश मानावा आणि संप मागे घ्यावं असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. त्यावर राज्यात मुख्यमंत्री बदलले काय? घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायची असते असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. 

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या संपावर न्यायालयाने भाष्य केलं असून कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा आदर करावा आणि संप मागे घ्यावा असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यात मुख्यमंत्री बदलले काय? घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायची असते. शरद पवार कसे काय घोषणा करतात. उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली पाहिजे असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post