विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर, बड्या नेत्याला डावलले

 

विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांना डावललेमुंबई: शिवसेनेने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे तर अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून विद्यमान आमदार गोपिकिशन बिजोरिया यांच्या नावाची आज शिवसेनेकडून घोषणा करण्यात आली.

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी 10 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या सात मतदारसंघांतील आठ सदस्यांची मुदत 1 जानेवारी रोजी संपत आहे. सोलापूर व नगर वगळता उर्वरित सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी  शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे तसेच विधान परिषद आमदार गोपिकिशन बिजोरिया हे आपला उमेदवारी अर्ज सोमवारी 22  किंवा मंगळवारी 23 नोव्हेंबर रोजी दाखल करतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post