राज्यात पावसातील भाषणाची ट्रेंड.... आता चंद्रकांत पाटील यांनीही साधली संधी...

 

नेत्यांना पावसातील भाषणाची आवड.... आता चंद्रकांत पाटील यांनीही साधली संधी...पुणे : शहरातील नवी पेठेतील सेनादत्त पोलीस चौकीसमोरील चौकाचे नामकरण करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे या चौकाचे नावे नाव ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आलं. फलक अनावरणानंतर मुख्य कार्यक्रम सुरुवात झाली. मात्र त्यानंतर काही वेळातच पावसाचेही आगमन झाले.

पाऊस पडू लागला तेव्हा चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू होते. मात्र त्यांनी पाऊस पडू लागल्यानंतरही मध्येच भाषण न थांबता सुरेश आप्पा माळवदकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. भर पावसामध्ये चंद्रकांत पाटील भाषण देत होते. बाजूला त्यांच्या मागेच एक व्यक्ती छत्री घेऊन उभी होती तर मंचावरील खुर्चांवर बसलेल्या काही मान्यवरांनाही डोक्यावर छत्री पकडली होती. मात्र चंद्रकांत पाटील हे पावसामध्ये भिजतच भाषण देत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post