सोयाबीनला 'भाव' मिळताच चोरटे सरसावले... नगर जिल्ह्यात शेतकऱ्याचे सव्वा लाखांचे सोयाबीन लांबविले...

सोयाबीनला 'भाव' मिळताच चोरटे सरसावले... नगर जिल्ह्यात शेतकऱ्याचे सव्वा लाखांचे सोयाबीन लांबविले... नगर- जामखेड तालुक्यातील मुंगेवाडी येथील शेनपट्टी शिवारात एक लाख पंचवीस हजार रुपयांचे सोयाबीन चोरीस गेले आहे.

येथील शेतकरी विठ्ठल गोपाळघरे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दिवसभर शेतात काम करून रात्री झोपल्यानंतर खळ्यावर केलेले पंचवीस किंटल सोयाबीन तीस गोण्यांमध्ये झाकून ठेवले होते. परंतु याच गोष्टीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेऊन रातोरात एक लाख पंचवीस हजार रुपयांचे सोयाबीन चोरून नेले. सकाळी उठल्यानंतर गोपाळघरे यांनी खळ्यावर जाऊन पाहिले असता सोयाबीन चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ घरच्यांना व परिसरातील शेजाऱ्यांना माहिती दिली.

 चोरीचा तपास करून विठ्ठल गोपाळघरे या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.  जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व पोलीस नाईक संभाजी शेंडे यांनी भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेतली आहे पुढील तपास पोलीस नाईक संजय जायभाय हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post