जिल्हा बँक निवडणूक... गृहराज्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याचा पराभव

 

जिल्हा बँक निवडणूक... गृहराज्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याचा पराभवसातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या  पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 10 जागांच्या निकालांची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, शिवसेना आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे  यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये धक्कादायक निकाल लागले असून आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे, तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले आहेत.

जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. पाटण विकास सेवा सोसायटी गटात सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले असून त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी राहिलेले  शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post