ऐन दिवाळीत आक्रोश... आंघोळीसाठी गेलेल्या तिघींचा ओढ्यात बुडून मृत्यू


ऐन दिवाळीत आक्रोश... आंघोळीसाठी गेलेल्या तिघींचा ओढ्यात बुडून मृत्यू सांगली : दीपावली पाडव्याच्या दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना सांगलीतील टाकळीमध्ये दिवाळीत शोककळा परसली आहे. गावातील तीन मुलींचा ओढ्यात बुडाल्याने मृत्यू झाला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील  टाकळीमध्ये ऐन दिवाळीत पाडव्याच्या दिवशी एक दुर्घटना घडली आहे. ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या तीन मुलींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. टाकळी येथील जुना मालगाव रस्त्यावरील मलेवाडी ओढ्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. नंदिनी देवा काळे (16), मेघा चव्हाण काळे (18) आणि स्वप्नाली टवळ्या पवार (6) अशी मयत मुलींची नावे आहेत. या मुली टाकळी येथील आंबेडकरनगर मधील पारधी वस्ती याठिकाणी राहण्यास होत्या.

ओढ्यात अंघोळीला गेल्यानंतर दुर्दैवी घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास या तीन मुली ओढ्यात अंघोळीला गेल्या होत्या. बराच वेळ झाला तरी घरी या मुली न  आल्याने त्यांच्या घरच्यांनी शोध सुरू केला.

 शोध सुरू असताना ओढ्याच्या काठावर तिघींची चप्पल, कपडे  पडल्याचे दिसून आल्याने पाण्यात बुडल्याची शंका आली. सदर घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना देतात घटनास्थळी पोलिस तात्काळ दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर तिघींची मृतदेह शोधून बाहेर काढला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post