मोदींनी बायबलची प्रत मस्तकी लावली, अंध भक्तांनी आता काय करावे!!


मोदींनी बायबलची प्रत मस्तकी लावली, अंध भक्तांनी आता काय करावे!! 'सामना'चा घणाघात   


 मुंबई : व्हॅटिकनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली. त्यावरुन आता सामनातून मोदी आणि मोदी भक्तांवर टीका करण्यात आली आहे. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा झालं असतं, असा घणाघात आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या  'सामना'तून करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी पोप यांना नुसतेच भेटले नाहीत तर पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली. मोदी यांनी आपल्या या कृतीतून स्वदेशातील मूलतत्त्ववाद्यांना कठोर संदेश दिला. देशात लोकशाही आहे. देश धर्मनिरपेक्ष आहे, असेच मोदींनी ‘व्हॅटिकन’मधून जगाला कळवले. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता आणि शुद्धीकरण मोहिमा सुरु झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल!

युरोप दौऱ्यावर असलेले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी हे पोप यांना भेटण्यासाठी व्हॅटिकन सिटीत गेले. मोदी हे साधारण तासभर पोपसाहेबांच्या सहवासात होते. पोपसाहेबांनी मोदी यांना पवित्र धर्मग्रंथ बायबल दिला आणि मोदी यांनी अत्यंत श्रद्धेने बायबलची प्रत मस्तकी लावली. मोदींनी दाखवलेल्या या श्रद्धेबद्दल अंधश्रद्धाळू भक्तांना काय म्हणायचे आहे? मोदी यांनी पोप यांना हिंदुस्थानात यायचे खास आमंत्रणही दिले. मोदी हे इटलीत गेले आणि अचानक पोप यांना भेटले. चारेक वर्षांपूर्वी मोदी हे विमान प्रवासात असताना अचानक इस्लामाबादेत उतरले होते आणि नवाज शरीफ यांना भेटायला गेले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post