खळबळजनक...ड्रग पेडलर आणि फडणवीस यांचे 'कनेक्शन' !... फोटो व्हायरल

 

खळबळजनक...ड्रग पेडलर आणि फडणवीस यांचे 'कनेक्शन' !... फोटो व्हायरलमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विटरवरुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मलिक यांनी भाजपा आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे.

“चलो आज भाजपा और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो नवाब मलिक यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलाय.

फोटोमध्ये अमृता यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती जयदीप राणा असून या व्यक्तीला जून २०२१ मध्ये एनसीबीने अटक केल्याचं सांगितलं जात आहे. ही व्यक्ती सध्या तुरुंगामध्ये असल्याचा दावा केला जातोय. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post