शिवसेनेला मोठा धक्का, शिवसेनेचे विद्यमान नगराध्यक्ष कुटुंबिय राष्ट्रवादीत दाखल


 शिवसेनेला मोठा धक्का, शिवसेनेचे विद्यमान नगराध्यक्ष कुटुंबिय राष्ट्रवादीत दाखल रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दापोली नगरपंचायच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांच्या कुटुंबियांनी शनिवारी राष्ट्रवादीत प्रवेश  केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परवीन शेख यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा न दिल्याने त्या तांत्रिक दृष्ट्या शिवसेनेच्या आहेत. असे असले तरी कार्यकाळ संपल्यावर त्याही राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात येते आहे.

रायगड कोलाड येथे  खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. दापोलीत शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेच्या शहरातील राजकरणात मोठा धक्का दिला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा क्षेत्रात राजकीय वातावरण तापले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post