विखेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा धमाका, भाजप नगरसेवक पदाधिकार्यांनी बांधले 'घड्याळ'

 

विखेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा धमाका, भाजप नगरसेवक पदाधिकार्यांनी बांधले 'घड्याळ'राहाता : शहरातील भाजपचे नगरसेवक निवृत्ती गाडेकर व त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बंडू वाबळे व कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षाची निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राहाता शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा सरचिटणीस रणजित बोठे,ओ.बी.सी सेलचे शहराध्यक्ष शेखर जमधडे, गुलशर शेख, युवक काँग्रेसचे जाईद दारु वाले, हेमंत अनाप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post