सनदी अधिकाऱ्याने घरातील ४३ लाखांचे सोनं,रोकड लक्ष्मीपूजनासाठी ठेवली.. चोरट्यांनी साधला डाव...

 सनदी अधिकाऱ्याने घरातील ४३ लाखांचे सोनं,रोकड लक्ष्मीपूजनासाठी ठेवली.. चोरट्यांनी साधला डाव...पुणे, : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यातील मुंढवा परिसरात जबरी चोरीची  घटना घडली आहे. मुंढवा परिसरात राहणाऱ्या महसूल विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरात भामट्यांनी डल्ला मारला आहे. यावेळी चोरट्यांनी लक्ष्मीपूजनामध्ये ठेवलेले तब्बल 150 तोळे सोनं आणि अडीच लाख रुपयांची रोकड असा एकूण 43 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून भामट्यांचा शोध घेतला जात आहे.

याप्रकरणी दत्तात्रय संभाजी डोईफोडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. डोईफोडे हे महसूल विभागातून निवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी आहेत. तर त्यांचे पुत्र सागर दत्तात्रय डोईफोडे हे आयएएस अधिकारी असून सध्या त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीरमध्ये आहे. दरम्यान गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डोईफोडे यांनी आपल्या घरातील सर्व सोनं लक्ष्मीपूजनासाठी ठेवलं होतं. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश करत 43 लाख 50 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post