मुळा नदी पात्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू, 'त्या' मातेला मंत्री तनपुरे यांनी दिला मदतीचा धनादेश

 मुळा नदी पात्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू, 'त्या' मातेला  मंत्री तनपुरे यांनी दिला मदतीचा धनादेशनगर: राहुरी शहरातील  भाग्यश्री पगारे यांची मुले अमर पगारे (वय वर्ष १५) आणि सुमित पगारे (वय वर्ष १२) या दोघांचा मुळा नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाग्यश्री पगारे यांची सांत्वनपर भेट घेतली. कोणत्याही मातेवर असा प्रसंग येऊ नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

श्रीमती भाग्यश्री पगारे यांच्यावर आता संसाराचा भार आहे. मुलीचे शिक्षण व उदरनिर्वाहासाठी त्यांना आर्थिक मदत होणे गरजेचे होते.  या भगिनीला ८ लाखांची मदत शासनातर्फे देण्यात आली. या मदतीने त्यांचं दुःख कमी तर होऊ शकणार नाही, परंतु येणाऱ्या काळात यामुळे एक आधार निश्चित मिळणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post