दीपावली पाडवा....आ.निलेश लंके यांना थेट शरद पवारांकडून मिळाला 'कानमंत्र'


दीपावली पाडवा....आ.निलेश लंके यांना थेट शरद पवारांकडून मिळाला कानमंत्रनगर:  दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. एकमेकांविषयीचा स्नेहभाव, विश्वास आणि आदर वृद्धिंगत करणारा आणि प्रत्येक नात्याला अधिक दृढ करणारा सण म्हणजे दिवाळी पाडवा. यानिमित्त आ.निलेश लंके यांनी  बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,देशाचे नेते, पद्मविभूषण  शरदचंद्र पवार  यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.व साहेबांच्या बहुमोल मार्गदर्शनासह आशीर्वाद घेतले. यावेळी खासदार सुप्रिया ताई सुळे ,कर्जत जामखेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार व लंके समवेत आलेले सहकारी उपस्थितीत होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post