नगरचा सुदर्शन कोतकर बनला 'उत्तर महाराष्ट्र केसरी'

 

नगरचा सुदर्शन कोतकर बनला 'उत्तर महाराष्ट्र केसरी'नगर : नगर येथील सुदर्शन महादेव कोतकर याने ‘उत्तर महाराष्ट्र केसरी’ हा किताब पटकावला आहे. नाशिक येथील बाळू बोडखे याच्यावर मात करत त्याने ही स्पर्धा जिंकली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ आणि संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्याच्या वतीने दोन दिवसीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 पाथर्डी येथे उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत अंतिम लढत नगर येथील सुदर्शन कोतकर आणि नाशिक येथी बाळू बोडखे यांच्यात पार पाडली. यात नगरच्या सुदर्शन कोतकरने बाजी मारली. सुदर्शन कोतकरने चांदीची गदा पटकावलीये.

सुदर्शन कोतकर आणि बाळू बोडखे यांच्यात तब्बल चाळीस मिनिटे कुस्ती रंगली. कोतकर यांचे वजन 124 किलो तर बोडखे यांचे वजन 84 किलो होते. मात्र, तरीही बोडखे यांनी कोतकरला सहजासहजी जिंकू दिले नाही. त्याने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली. मात्र, अखेर सुदर्शन कोतकर याने ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला. तर, बाळू बोडखेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत तृतीय क्रमांक नगर येथील अनिल ब्राम्हणे याने पटकावला. सुदर्शन कोतकरला पुरस्कार म्हणून चांदीची गदा आणि 51 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post