नगर तालुक्यातील 'या' तीन ग्रामपंचायतींची मिळून होणार नगर परिषद, प्रारूप अधिसूचना जारी


नगर तालुक्यातील 'या' तीन ग्रामपंचायतींची मिळून होणार नगर परिषद, प्रारूप अधिसूचना जारीनगर: नगर तालुक्यातील नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या ग्रामपंचायतीची मिळून नागरदेवळे नगर परिषद लवकरच अस्तित्वात येणार आहे. नगर विकास विभागाने याबाबतची प्रारूप अधिसूचना जारी केली आहे. त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. नगर शहराजवळ असलेल्या या ग्रामपंचायती परिसरात नागरी वसाहती वाढल्याने नगर परिषद स्थापन करण्याची मागणी होत होती. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत असल्याने हा प्रस्ताव मार्गी लागला आहे.

 नगरविकास विभाग

नगर विकास मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ नोव्हेंबर २०२१

उद्घोषणा

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.क्रमांक एमयूएम-२०२०/प्र.क्र. २९१/ नवि-१७.- महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५(सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ३ चे पोट-कलम (३) च्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे, अहमदनगर जिल्ह्यातील नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या ग्रामपंचायतींचे स्थानिक क्षेत्र हे लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी आणि उक्त क्षेत्रासाठी “नागरदेवळे नगरपरिषद” या नावाने नगरपरिषद गठित करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२A) आणि (३) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत आहे.

२. उक्त अधिसूचनेला कोणताही आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीने ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, अहमदनगर, हातमपूरा, जी. पी.ओ. जवळ, अहमदनगर ४१४००१ यांच्याकडे लेखी आक्षेप कारणांसह सादर करणे आवश्यक असेल.

३. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post