पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली जिल्हा रुग्णालयाची पाहणी... आगीच्या दुर्घट़नेबाबत म्हणाले...


पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली जिल्हा रुग्णालयाची पाहणी... म्हणाले... नगर: नगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला. तर, अन्य काहीजण जखमी देखील झाले आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागल्याची घटना घडली. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते आणि हे सर्व रुग्ण करोनाबाधित होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. 

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना याबात माहिती देताना सांगितले की, अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेबाबत विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही दुर्दैवी घटना आहे. सरकारने पुन्हा फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही अशा घटना घडणे दुर्दैवीच आहेत. असं मुश्रीफ म्हणाले आहेत.

या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तर, या घटनेची चौकशी करण्यासाठी आता चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post