पंकजा मुंडे म्हणतात... पदासाठी कुणापुढे हात पसरणार नाही... पुन्हा समोर आली खदखद

 

पंकजा मुंडे म्हणतात... पदासाठी कुणापुढे हात पसरणार नाही... पुन्हा समोर आली खदखदमुंबई: बंजारा समाजातील माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या गौरव कार्यक्रमामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलत असताना उपस्थित जनसमुदायासमोर मी फाटक्या माणसांच्या पायावरती डोकं ठेवेन मात्र पदासाठी कुणापुढेही हात पसरणार नाही, असं वक्तव्य केलं. पंकजा मुंडे यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली खदखद पुन्हा एकदा समोर आल्याचे बोलले जात आहे.

पंकजा मुंडे या विधानसभेत पराभूत झाल्यानंतर त्यांचे कुठेही पुनर्वसन झालेले नाही. आता विधानपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देण्यात आली आहे. इतकच नाही तर भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे यांचेसुद्धा भाजपकडून पुनर्वसन केले जातेय. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाची साधी चर्चासुद्धा झालेली नाही. 

 महाराष्ट्रातल्या किमान 25 मतदारसंघांवर पंकजा यांचा थेट प्रभाव आहे. मात्र त्यांना सध्या पक्षांमध्ये न्याय मिळत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत. पंकजा मुंडे यांच्या बोलण्यातून त्या नाराज असल्याचं अनेकदा स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला याचा फकटा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post