गडाखांचे सुपुत्र व घुलेंचे होणारे जावई उदयन गडाख यांच्याकडे आली मोठी जबाबदारी

गडाखांचे सुपुत्र व घुलेंचे भावी जावई उदयन गडाख यांच्याकडे आली मोठी जबाबदारीनगर : महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे पूत्र उदयन गडाख शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे जावई होणार आहेत. त्यांच्या रुपाने गडाख कुटूंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख संस्थापक असलेल्या मुळा एज्युकेशन संस्थेचे सोळा माध्यमिक विद्यालय, सहा इंग्रजी माध्यमाचे विद्यालय तर अन्य सात महाविद्यालय असून 20 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचा एकूण 1300 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. संस्था व यशवंत प्रतिष्ठाणच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

संस्था अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख सध्या आजारी असल्याने जेष्ठ नेते गडाख यांच्या सूचनेनंतर काही महिन्यांपूर्वी नवीन नऊ सदस्य निवडण्यात आले होते. आज सर्व सदस्यांची पहिली बैठक झाली.यामध्ये सर्वानुमते गडाख यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपस्थित ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव उत्तम लोंढे यांनी आभार व्यक्त केले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post