दिल्ली अभी बाकी है... खा.डॉ.प्रितम मुंडे यांचे नगर जिल्ह्यात मंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य...

 

  दिल्ली अभी बाकी है... खा.डॉ.प्रितम मुंडे यांचे नगर जिल्ह्यात मंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य...नगर : खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी काल पाथर्डीला भेट दिली.भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, गोकुळ दौंड, अशोक गर्जे आदी उपस्थित होते.

डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या, मंत्रिपदाच्या शर्यतीत मी कधीच नव्हते. त्यामुळे मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून तुम्ही नाराज होऊ नका. माझ्या दृष्टीने तुमचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्वाभिमानाने कसे जगायचे, याची शिकवण आपल्या सर्वांना दिली आहे. त्यांची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. राजकारणात आपण अपार कष्ट घेणार असून, ये तो बस झाकी है, दिल्ली अभी बाकी है, असे खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितले.

 पाथर्डी तालुक्यास दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे मावशी म्हणत. त्या नात्याने पाथर्डी माझी आजी आहे. तुमच्याकडून मला काकणभर जास्त मायेची गरज आहे. तुमचे आशीर्वाद मला मतदानातून मिळत नाही, ही खंत आहे. या तालुक्याचा समावेश जर बीड लोकसभा मतदारसंघात झाला असता, तर मला अधिक आनंद झाला असता. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post