आ.मोनिका राजळे आक्रमक....संस्थांचे वाटोळे करणारांना आगामी निवडणुकांत घरी बसवा


आ.मोनिका राजळे आक्रमक....संस्थांचे वाटोळे करणारांना आगामी निवडणुकांत घरी बसवानगर:  एखादी संस्था अनेकांच्या कष्टातून नावारूपाला येते.तीच संस्था आपल्या डोळ्यादेखत डबघाईला येते. एखादा निर्णय चुकला तर काय होते हे आपण बाजार समितीमध्ये अनुभवले आहे. गेली पाच वर्षे बाजार समितीमध्ये कसा कारभार केला.काय दिवे लावले चांगल्या संस्थेचे वाटोळे कसे केले हे तुम्ही पाहिले. जनतेची कामे न करता फक्त राजकारण करून संस्थांचे वाटोळे करणारांना आगामी निवडणुकांत घरी बसवा, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी येथे केले.


पाथर्डी तालुक्यातील काळेवाडी, हाकेवाडी, कळसपिंप्री व जवखेडे खालसा येथे जिल्हा नियोजन समीती, नाबार्ड व आमदार स्थानिक विकास निधीतुन सुमारे अडीच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आ.मोनिका राजळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री व गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज होते हे होते. तर भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशी गोल्हार, सभापती गोकुळ दौंड, पंचायत समीती सदस्य सुनील ओव्हळ, सुभाष केकाण, अजय रक्ताटे, भगवान साठे, मोहज देवढेच्या सरपंच अर्चना हाके, माजी सरपंच गणेश चितळकर, अजित देवढे, लक्ष्मण काळे, बाळू पडळकर, रामभाऊ वाघमोडे, नामदेव काळे, अशोक रुपनर, दत्तू काळे, बबन काळे, भिवाजी काळे, दादा रुपनर, महादेव जायभाये,आदी प्रमुख उपस्थित होते.


आ.राजळे म्हणाल्या, आमदार निधी वाटपात भेदभाव केला जातो. महाविकास आघाडी सरकार फक्त घोषणा करते. शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी वीज बील वसुलीसाठी शेतीपंपाची वीज तोडली जात आहे. दोन वर्षे झाले तरी शासकीय समित्या सुध्दा करता आल्या नाहीत. प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाते. आशा या शेतकरीविरोधी महाविकास आघाडी सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनता जागा दाखवेल, असेही त्या म्हणाल्या. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post