कृषी कायदे पुन्हा लागू होऊ शकतात, भाजप नेते राहीलेल्या राज्यपालांचे धक्कादायक विधान

 

कृषी कायदे पुन्हा लागू होऊ शकतात, भाजप नेते राहीलेल्या राज्यपालांचे धक्कादायक विधानजयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी या कायद्यांबाबतचं वेगळच विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. गरज पडल्यास पुन्हा कृषी कायदे लागू करू, असं धक्कादायक विधान मिश्र यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भदोही येथे मीडियाशी संवाद साधताना कलराज मिश्र यांनी हे विधान केलं आहे. 

कृषी कायदे मागे घेण्यात आल्यानंतर मिश्र यांनी त्याचं समर्थन केलं होतं. तसेच मोदींच्या या निर्णयाची प्रशंसाही केली होती. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच होते. सरकारने शेतकऱ्यांना समजावण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र तरीही शेतकरी आंदोलनावर ठाम होते. कृषी कायदे मागे घ्या म्हणून अडून बसले होते. त्यामुळेच सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागले, असं त्यांनी म्हटलं होतं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post