देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु....नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

 

देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु....नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोपमुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज भाजपचे विरोधाीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात वादंग उठण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर टीका केली, तर त्यासोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही गंभीर आरोप केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.

फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहातो. ज्याला माजी सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post