राज्यात आणखी एका सहकारी बँकेवर RBI चे निर्बंध... खात्यातून फक्त १० हजार रुपये काढण्याची मुभा

 

राज्यात आणखी एका सहकारी बँकेवर RBI चे निर्बंध... खात्यातून फक्त १० हजार रुपये काढण्याची मुभानवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी महाराष्ट्रातील मलकापूर नागरी सहकारी बँकेच्या ग्राहकांवर विविध निर्बंध लादलेत. या सहकारी बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याचे लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलेय. रिझर्व्ह बँकेने एक निवेदन प्रसिद्धीस दिलेय. मलकापूर नागरी सहकारी बँक कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण करणार नाही, कोणतीही गुंतवणूक करणार नाही, आणि आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही पेमेंट करणार नाही, असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय.

मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांसाठी RBI ने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक म्हणजे त्यांना 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. बचत आणि चालू खाते अशा दोन्ही ग्राहकांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. विशेष म्हणजे सर्व बचत बँक किंवा चालू खात्यांमधून किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेच्या 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नाही, असे आरबीआयने म्हटलेय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post