केंद्राकडून 'हॅपी दिवाळी'... गॅस सिलेंडर तब्बल २६५ रूपयांनी महागले

 केंद्राकडून हॅपी दिवाली... गॅस सिलेंडर तब्बल २६५ रूपयांनी महागलेनवी दिल्ली: दिवाळीच्या पहिल्यात दिवशी केंद्र सरकारने देशातील सामान्य नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून व्यावसायिक वापराच्या गॅसच्या दरात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 265 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. 1 नोव्हेंबरला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली. त्यामुळे व्यावसायिक वापराचा 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1736.5 रुपयांवरुन 2000.5 रुपये इतकी झाली आहे.


पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी सबसिडी फ्री 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post