'लस घेतली नाही व घेणारही नाही' म्हणणारे इंदूरीकर महाराज आता म्हणतात....

 'लस घेतली नाही व घेणारही नाही' म्हणणारे इंदूरीकर महाराज आता म्हणतात....नगर : ‘मी करोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही,’ असे वक्तव्य निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी नाशिक जिल्ह्यात बोलताना केले होते. त्यावर राज्यभर पडसाद उमटले.  यावर आता स्वत: इंदुरीकरांनीची नगर तालुक्यातील कौडगाव येथील कीर्तनातून भाष्य केले आहे. ‘मी लस घेतली नाही, घेणार नाही असे म्हणालो. परंतु इतरांनी लस घेऊ नये असे मी कुठेही म्हटलेले नाही,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मात्र, सोशल मीडियातून आपली जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. ते म्हणाले, ‘दोन तासांच्या कीर्तनात एखादा शब्द चुकून जातो. तोच धागा पकडून स्वत:चा टीआरपी वाढविण्यासाठी मला लक्ष्य करतात’, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. विशेष म्हणजे कीर्तन सुरू असताना सुरू असलेले कॅमेरे त्यांनी बंद करायला लावले. त्यानंतरच पुढे कीर्तन सुरू केले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post