पराभवाच्या भीतीने भाजपने पळ काढला – एकनाथ खडसे

 पराभवाच्या भीतीने भाजपने पळ काढला –  एकनाथ खडसे  जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार असतानाही पराभवाच्या भीतीने भाजपा ने पळ काढला असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. एकवीस पैकी एकवीस जागा आमच्या येणार असून महविकासा आघाडीचाच अध्यक्ष होणार असल्याचं मत एकनाथ खडसे यांनी मतदान प्रसंगी मुक्ताई नगर येथे व्यक्त केले आहे.  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी चे नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्व खाली महविकास आघाडी कडून सहकार पॅनल उभे करण्यात आले आहे.

या पॅनल मधील अकरा जागा  अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित दहा जागा साठी आज मतदान होत आहे.या दहा जागा ही आम्हालाच मिळतील असा दावा करीत सर्वचे सर्व एकवीस जागा वर सहकार पॅनलला यश मिळेल असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post