मोठी बातमी.. नगर जिल्ह्यात कलम १४४ लागू, 'या' गोष्टींवर निर्बंध

 

मोठी बातमी.. नगर जिल्ह्यात कलम १४४ लागूनगर:  पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचेकडील पत्र जिविशा/कलम144/ प्रतिबंधात्मक आदेश1100/2021, दिनांक 21/11/2021 चे पत्रान्वये अहमदनगर जिल्हयात विविध राजकीय पक्ष, संघटना यांचे वतीने विविध मागण्यांसाठी रास्तारोको, मार्यों, धरणेआंदोलन, इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयसमोर होत असतात. त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. तसेच एस.टी.महामंडळाचे विविध संघटनानी एस.टी.कर्मचा-यांचे विलगीकरण राज्य शासनामध्ये व्हावे, कर्जमाफी, कामगार करार इत्यादी मागण्यांसाठी बंद पुकारलेला असून अहमदनगर जिल्हयात 11 ठिकाणी एस.टी.महामंडळ कर्मचा-यांचे आंदोलने चालू आहेत.

वरील पार्श्वभूमी पहाता सदर आंदोलनात्मक कार्यक्रमावेळी मोठया प्रमाणात गर्दी होणेची शक्यता असून कोणत्याही प्रकारच्या किरकोळ घटनावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये किंबहूना तशी परिस्थीती निर्माण झाल्यास ती हातळण्यास पोलीसांना मदत व्हावी, यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थल सिमेच्या हद्दीत पाच किंवा पाचपेक्षा अधीक व्यक्तींनी एकत्र येवू नये या करता दिनांक 22/11/2021 रोजीचे 00.01 वाजलेपासून ते दिनांक 28/11/2021 रोजीचे 24 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी सदर आदेश जारी केले आहेत.,

 फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येत आहेत.

सदर कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा अधीक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post