कलाबेन डेलकर यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट.... म्हणाल्या...

कलाबेन डेलकर यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट.... मुंबईः दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेने भगवा फडकावलाय. दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी भाजप उमेदवाराचा दणदणीत पराभव करत विजय संपादन केलाय. त्यानंतर आज त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी जात भेट घेतलीय. तसेच शिवसेनेनं निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केलाय. कलाबेन डेलकरांच्या रूपानं दादरा नगर हवेलीत प्रथमच शिवसेनेनं महाराष्ट्राबाहेर लोकसभा जागा जिंकण्याची किमया साधलीय.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर कलाबेन डेलकरांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादही साधलाय. शिवसेना परिवार, प्रदेशातील लोकांचं आणि डेलकरांचा आशीर्वाद होता. त्यामुळे मी चांगल्या मताधिक्क्यानं निवडून आली. त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठीच मी उद्धव ठाकरेंना भेटायला आलेय, असंही त्या म्हणाल्यात. जे आमचे निवडणुकीचे मुद्दे आहेत ते घेऊन पुढे जाणार आहोत. विकासाचा मुद्दा होता. बेरोजगारीचा मुद्दा होता. तीच आमची पुढची रणनीती असणार आहे. त्याद्वारेच आम्ही पुढे जाणार आहोत. उद्धव ठाकरे लवकरच आमच्या प्रदेशात येणार आहेत, असं त्यांनी आश्वासन दिलंय, याचाही कलाबेन डेलकरांनी आवर्जून उल्लेख केलाय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post