मी लस घेतली नाही व घेणारही नाही...इंदोरीकर महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य...

 

मी लस घेतली नाही व घेणारही नाही...इंदोरीकर महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य...नाशिक : राज्यातील लोकप्रिय किर्तनकार म्हणून ओळखले जाणारे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी पुन्हा किर्तनामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोरोना झालेल्या लोकांना यम त्रास देणार नाही एवढा त्रास घरच्यांनी दिला आहे. तसेच आपण कोरोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नसल्याचं वक्तव्य त्यांनी किर्तनात केलं आहे. 

एकीकडे सरकार सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करत असतांनाच दुसरीकडे भर कीर्तनात 'मी कोरोनाची लस घेणार नाही.' असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केलं आहे. ते लोकनेते स्वर्गीय गोपाळरावजी गुळवे यांच्या 81 व्या जयंती निमित्ताने घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वरिल वक्तव्य केलं आहे.

कोरोना रुग्णांना मानसिक आधार न दिल्याने जास्त लोक मृत्यू पावले असल्याचही ते म्हणाले. तसंच कोरोनाला एकच औषध आहे ते म्हणजे मन खंबीर ठेवा असही इंदोरीकर महाराज यावेळी म्हणाले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post