सुखी संसाराची शोकांतिका.... पत्नीच्या आत्महत्येनंतर दुसऱ्या दिवशी पतीनेही घेतला गळफास...

 सुखी संसाराची शोकांतिका.... पत्नीच्या आत्महत्येनंतर दुसऱ्या दिवशी पतीनेही घेतला गळफास...हिंगोली:  पत्नीच्या आत्महत्येनंतर दुसऱ्याच दिवशी पतीने ही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावात ही दुर्दैवी घटना घडली असून, या मुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. काजल घोघरे व सोनू घोघरे असे आत्महत्या केलेल्या या जोडप्यांची नावे असून, वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह सोहळा झाला होता. हे दोघे जण सुखी संसाराची गोड स्वप्ने रंगवत असताना, अचानक त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

 माहिती नुसार , या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला होता, त्या नंतर काजलने, स्वतःला गळफास लावून घेतला होता, त्या नंतर पत्नीच्या मृत्यूने धक्का बसलेल्या पती सोनू ने आज गळफास लावून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी बाळापूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली  आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post