लस घेतली नाही घेणार नाही म्हणणार्या इंदूरीकर महाराजांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे करणार 'प्रबोधन'

 

लस घेतली नाही घेणार नाही म्हणणार्या इंदूरीकर महाराजांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे करणार 'प्रबोधन'बारामती : प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत केलेल्या वक्त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असतानाच, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर यांच्या वक्तव्याबाबत त्यांची समजूत काढणार असल्याचे सांगितले आहे.

त्यांच्या स्टाईल मध्ये केलेल्या प्रबोधनातून समाजामध्ये जागृती होते. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधन बंद असताना त्यांचा समाजाशी जास्त संपर्क आला नाही.

जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांनी जाणले आहे. महाराजांचा अध्यात्मिक अभ्यास जास्त आहे. मात्र, वैज्ञानिक बाजू देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post