आ.संजय शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प.... ग्रामसेवक झाले आक्रमक

 

आ.संजय शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प.... ग्रामसेवक झाले आक्रमकऔरंगाबाद: औरंगाबाद येथे झालेल्या महिला सरपंच परिषदेत बोलताना शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली आणि त्यांनी ग्रामसेवकांच्या बाबतीत बोलताना अपशब्द काढले. मात्र यावरून राज्यभरातील ग्रामसेवकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या वक्तव्याचा निषेध केला आहे. आज राज्यभरातील ग्रामसेवकांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले. तसेच आमदार संजय शिरसाट यांनी समस्त ग्रामसेवक वर्गाची माफी मागावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. तसेच समाजात ग्रामसेवकांबद्दल गैरसमज निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल शिरसाट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही ग्रामसेवकांच्या वतीने करण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये सोमवारी महिला सरपंच परिषद झाली. यावेळी बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘एक लक्षात ठेवा, सगळ्यात भामटा माणूस असेल तर तो ग्रामसेवक आहे. तो तुम्हाला कधी मूर्ख बनवेल, हे सांगता येत नाही. तो तुमचे ऐकतो असे दाखवेल, पण बाहेर गेल्यास सरपंचांच्या सांगण्यावरून केले असे सांगत स्वतःच्या अंगावर काही येऊ देत नाही.’ त्यामुळे महिला सरपंचांनी त्यांच्यापासून दूर रहावं, असा सल्ला आमदार शिरसाट यांनी यावेळी दिला.

ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे म्हणाले की,   आमदार शिरसाट यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे राज्यभरातील ग्रामसेवकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. 27 हजार 536 ग्रामपंचायतींचं कामकाज ठप्प झालेलं आहे. त्यांनी विनाशर्त माफी मागावी. मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून आमदारांना सक्त ताकीद द्यावी. ग्रामसेवकांबद्दल समाजात गैरसमज निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जावा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post