भाजपच्या दिग्गज नेत्याचा मुलगा पक्षावर नाराज, विधानसभेच्या उमेदवारीसाठी दिला इशारा...

 भाजपच्या दिग्गज नेत्याचा मुलगा पक्षावर नाराज, विधानसभेच्या उमेदवारीसाठी दिला इशारा...पणजी : गोव्यात काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीआधी  भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पक्षाला थेट धमकी दिली आहे. पक्षाने तिकिट नाकारल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा जाहीर इशाराही त्यांनी दिला आहे. यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले आहे.

पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते तसेच, संरक्षण मंत्रीही होते. त्यांच्या मृत्यूने गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पर्रीकर हे तब्बल 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. आता मतदारसंघावर त्यांचे पुत्र उत्पल यांनी दावा सांगितला आहे. त्यांनी यासाठी पक्ष नेतृत्वाला थेट धमकीवजा इशारा दिला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post