विधानपरिषद निवडणुक...घुले, कोल्हे यांचे 'वेट अँड वाच'

 

विधानपरिषद निवडणुक...घुले, कोल्हे यांचे 'वेट अँड वाच'नगर: विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कर्डिले ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही जाऊ शकतात अशी चर्चा आहे. मात्र आता या मतदारसंघात आणखी काही नावं संभाव्य उमेदवार म्हणून समोर येत आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील तसेच भाजपच्या कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नावाची चर्चा आहे. या दोघांकडून सध्या वेट अँड वाच अशी भूमिका घेतली जात आहे. जिल्हा परिषदेची सत्ता घुले यांच्या ताब्यात आहे.  या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संपर्क ठेवलेला आहे. दुसरीकडे कोल्हे सुध्दा जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याचे सांगितले जात आहे. कर्डिले यांच्यासाठी खा सुजय विखे पाटील स्वतः मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अशा वेळी भाजप श्रेष्ठी आपलं वजन कोणाच्या पारड्यात टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. घुले यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शेवगाव पाथर्डी मतदारसंघात उमेदवारीचा त्याग करत प्रताप ढाकणे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात भूमिका बजावली होती. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्याही नावाचा गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post