आग सीलिंगमधून सुरू झालेली दिसते, देवेंद्र फडणवीस यांनी काढले नगर जिल्हा रूग्णालयातील प्रशासनाचे वाभाडे

 आग सीलिंगमधून सुरू झालेली दिसते, देवेंद्र फडणवीस यांनी काढले नगर जिल्हा रूग्णालयातील प्रशासनाचे वाभाडेनगर: अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात आज एक अतिशय मोठी दुर्घटना घडली. जिल्हा रुग्णालयास भीषण आग लागून त्यात ११ जणांचा मृत्यू झाला. तर, अन्य काहीजण जखमी देखील झाले आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागल्याची घटना घडली. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते आणि हे सर्व रुग्ण करोनाबाधित होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेवरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधल्याचं दिसत आहे.

“ रूग्णालयातील आगीच्या भंडारासह राज्यात अनेक घटना घडूनही सरकारने कोणताही धडा घेतलेला नाही. नगरच्या घटनेत पोलिसांनी जे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले, त्यात आग सीलिंगमधून सुरू झालेली दिसते, महापालिकेकडून फायर सेफ्टी प्राप्त नाही.वायरिंगबाबत इलेक्ट्रीकल अभियंत्याने कळविलेले, हायड्रेशन आणि स्प्रिंकलर प्रणालीला आर्थिक मंजुरी आरोग्य आयुक्तांकडे काही महिन्यांपासून प्रलंबित. नगर सामान्य रूग्णालयाची ही आहे दुरावस्था. ११ निष्पाप बळी घेणार्‍या सर्वच दोषींवर कठोर कारवाई व्हावी. शेवटी कुणी जबाबदारी घेणार की नाही? असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. ”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post