हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घाला, देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान... हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना नाहक अडकवले जाते....


हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घाला, देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान... हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना नाहक अडकवले जाते....



अमरावती येथे आज विविध भागात भेटी दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मांडलेले प्रमुख मुद्दे असे: 

➡️ अमरावती येथील घटनाक्रम दुर्दैवी.

अमरावती येथील मोर्चाला परवानगी कुणी दिली? याची चौकशी झाली पाहिजे.

➡️ आदल्या दिवशी झालेला घटनाक्रम दुर्लक्षित करायचा आणि केवळ दुसऱ्या दिवशीच्या घटनांवर केवळ लक्ष केंद्रीत करायचे हे योग्य नाही.

भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात येत आहे. टार्गेट करून, याद्या तयार करून सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे.

➡️ एका घटनेसाठी चार-चार पोलिस ठाण्यात कारवाई!

ज्यांचा काही संबंध नाही, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जात आहे.

जर खोट्या गुन्ह्यात अडकवायचे असेल तर आमचे सारे कार्यकर्ते एकत्र जेलभरो आंदोलन करतील.

➡️ त्रिपुरा येथे जी घटना घडली नाही, त्यावर १२ तारखेचा मोर्चा निघाला.

हे मोर्चे मोठ्या षडयंत्राचा भाग होता. मात्र जणू १२ तारखेला काही घडलेच नाही, असे सांगण्याचा राज्य सरकार आणि पोलिसांचा प्रयत्न आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा प्रचंड दबावात काम करते आहे.

➡️ त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत, त्यावर वातावरण तापवले गेले.

तेथील पोलिसांनी सर्व बाबींचा उलगडा केला.

तरी सुद्धा ८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी त्यावर ट्विट केले.

➡️ जेव्हा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाच्या अजेंड्याला विरोध करू शकत नाही, तेव्हा संपूर्ण देशात लांगूलचालन करून अराजकता माजविण्याचा प्रयत्न.

असेल हिंमत तर घाला रझा अकादमीवर बंदी.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post